कुन्नूर मध्ये रविवारपासून 'अरिहंत चषक' शुटिंग हॉलीबॉल स्पर्धा

आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी : उत्तम पाटील यांची माहिती


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

कुन्नूर येथील श्री. दत्त शूटिंग हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले आहे. बोरगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

उत्तम पाटील म्हणाले, स्पर्धेमध्ये दिल्ली, पंजाब मुंबई मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेमधील खेळाडूंची राहणे व जेवणाची व्यवस्था केली आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरीची निर्मिती केली आहे. सलग दोन दिवस दिवस रात्र प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे २१ हजार रुपये, १५ हजार रुपये, १० हजार रुपये आणि सर्वच सहभागी संघांना मानधन देण्यात येणार आहे. कुन्नूर येथे खंड पडलेल्या या स्पर्धा यंदा प्रथमच दत्त मंदिर पटांगणामध्ये भरविल्या जात आहेत. यापूर्वी या गावचे सहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. येथील लायको भोसले यांनी सलग वीस वर्षे या संघाचे नेतृत्व केले आहे. कुन्नूर मधील स्पर्धेसाठी दत्त शूटिंग हॉलीबॉल मंडळाच्या नेतृत्वाखाली उत्तम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेची ग्रामीण भागातील खेळाडू व प्रेक्षकांसाठी मेजवानी मिळणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्तम पाटील यांनी शेवटी केले. यावेळी राज्य शूटिंग बॉल हॉलीबॉल संघाचे कॅप्टन नायकू भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी विलास पाटील, शिवाजी निकम, तानाजी चेंडके, पोपट जाधव, माणिक कांबळे, चेतन मगदूम, रजनीकांत जाधव, महेंद्र जाधव, गोटू नागराज, रवी मगदूम, शिवाजी निरूखे, दीपक पाटील, राजेंद्र खराडे, वरून कुलकर्णी, संतोष कोळी, सागर खोत, शंकर ढंग, राजेंद्र खराडे, रामा खराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष