पुतळा विटंबना घटनेचा निषेध : भ्याड कृती करणाऱ्यावर कारवाई करावी : प्रहार संघटनेचे दगडू माने



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात सहभाग घेऊन क्रांती घडवली आहे.त्यांच्यामुळेच परिवर्तन चळवळीची मशाल पेटली असून सर्वसामान्य जनतेचे ते दैवत आहेत.

मात्र काही दृष्ट प्रवृत्तीच्या व विचार कंगाल प्रवृत्तीने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार घडल्याने दुःख झाले. 

 या पुतळा विटंबना घटनेचा आम्ही निषेध करीत असून या घटनेचा छडा लागला पाहिजे, शिवाय त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी केली आहे.

    लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या पुतळा विटंबना निषेधार्थ समस्त मातंग समाज व डॉ आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथे शनिवारी गाव बंदची हाक दिली आहे. कुरुंदवाड मधील नागरिक' व्यापारी यांनी या बंद आंदोलनात सहभागी होऊन निषेध आंदोलनास सहकार्य करावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे दगडू माने यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष