घोडावत पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक समुपदेशकांसाठी कार्यशाळेचे आयोजन


 जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक समुपदेशन संघ आणि संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अधिवेशन व मार्गदर्शन कार्यशाळा दिनांक 27 आणि 28 जानेवारी 2023 वेळ सकाळी 10.00 ते 5.00 या वेळात आयोजित करण्यात आलेली आहे. अधिवेशन व कार्यशाळेचे उद्घाटन मा. नामदार श्री. दीपक केसरकरसाहेब, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक भोसले विश्वस्त, संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक समुपदेशक संघ हा शासनाचा एक वर्ष व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मध्यमिक शिक्षकांची मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेचे ध्येय महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करणे आहे. महाराष्ट्र राज्यातून 300 हून अधिक समुपदेशक उपस्थित राहणार असून त्यांना विविध नवीन झालेल्या शैक्षणिक धोरणातील बदलांचे तसेच तांत्रिक समुपदेशनाचे कौशल्य नाविन्यताचे मार्गदर्शन करून सक्षम समुपदेशक निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य, आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विराट व्ही. गिरी यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली आहे. या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये विविध क्षेत्रांमधिल तज्ञांचे समुपदेशकांसाठी मार्गदर्शनाचे आयोजन केलेले असून त्यामध्ये समुपदेशन आणि सद्य परिस्थितीमध्ये समुपदेशकांची भूमिका प्रोफेसर डॉ. अरुण पाटील, कुलगुरू संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर, बदलती जागतिक आव्हाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृती बुद्धिमत्ता मधील बदल प्रा. डॉ. शितोळे, सहयोगी प्राध्यापक महावीर विद्यालय कोल्हापूर, समुपदेशकांच्या विविध भूमिका आणि तांत्रिक नाविन्यता प्रा. विराट व्ही गिरी, प्राचार्य संजय घोडावत पॉलीटेक्निक कोल्हापूर, शिक्षणातून मुलांच्या मानसिकतेचा शोध प्रा. रेणू दांडेकर, दापोली या मान्यवरांच्या विविध क्षेत्रांमध्ये व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.

या राज्यस्तरीय अधिवेशन व मार्गदर्शन कायर्शाळेच्या आयोजनाला प्रा. अजय बी. कोंगे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, श्री. कृष्णा बोराटे, विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समुपदेशन संघ कोल्हापूर, किशोर बनारसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समुपदेशक संघ, श्री राजाराम पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समुपदेशन संघ, गुरुप्रसाद लंबे संभाजी पाटील व इतर सदस्य परिश्रम घेत आहे.

या राज्यस्तरीय अधिवेशन व मार्गदर्शन कायर्शाळेस संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष