माणिका नागावे यांच्या प्रकृती या संग्रहाचे उत्साहात प्रकाशन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
काव्यप्रेमी शिक्षक मंच,महाराष्ट्र राज्य,मराठी विभाग,श्रीमती कुसुमताई राजारामबापू कन्या महाविद्यालय, इस्लामपूर व बिझनेस एक्सप्रेस श्री फांऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय काव्यसंमेलन 2023 मध्ये श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे, मुख्याध्यापिका हेरवाड हायस्कूल, हेरवाड यांच्या"प्रकृती "या संग्रहाचे प्रकाशन मा.प्रा.शामराव पाटील, सदस्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र राज्य.यांच्या हस्ते पार पडले.श्रीमती नागावे यांचे हे सहावे पुस्तक आहे. हायकू हा प्रकार तीन ओळीत पाच-सात-पाच या आकृतीबंधात बांधलेला असतो.या हायकू संग्रहात एकुण ११४ विषयांना कवयित्रीने स्पर्श केला आहे. साहित्यिक श्री. दयासागर बन्ने यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी" निसर्ग संवेदनांशी समरस होणारी हायकू प्रकृती " असा उल्लेख केला आहे. धैर्यवेद प्रकाशन कोथळीचे श्री. सुरज परीट यांनी सुंदर पुस्तकबांधणी केली आहे. यावेळी मा.श्री ए.आय.मुजावर, मुख्य संपादक, बिझनेस एक्सप्रेस, मा.श्री. आनंद घोडके सर राजाध्यक्ष काव्यप्रेमी शिक्षक मंच,मा.श्री.ऍडव्होकेट संग्राम पाटील-संचालक, राजाराम बापू पाटील सह.बँक,पेठ,मा.श्री. शशांक चोथे,-प्राध्यापक, सौ.पल्लवी पाटील, जस्मीन शेख,श्री. बोंगाळे सर,कोल्हापूर, सांगली,सातारा जिल्ह्यातील साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथील श्रीमती कुसुमताई राजाराम पाटील कन्या महाविद्यालयात संपन्न झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा