शळेतील संस्कारामुळेच खरे करिअर उभे राहते : इलियास मुल्लाणी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड - हायस्कूल मध्ये असताना कॉलेजचे आकर्षण असते आणि कॉलेजमध्ये गेल्यावर शाळेचे आकर्षण वाढते . मात्र मुलांनो खरे संस्कार शाळेतच झालेले असतात. आणि यावरच आपले खरे करिअर उभे राहते. त्यामुळे शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन तरुण उद्योजक इलियास मुल्लानी यांनी केले.
हेरवाड तालुका शिरोळ येथील हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले, परिस्थिती अत्यंत गंभीर असताना मी घडलो ते ये या शाळेच्या संस्कारामुळेच, शालेय प्रार्थना जयंती जयंती कार्यक्रम विविध गुणदर्शन वेगवेगळ्या स्पर्धा यामुळे नकळत खूप शिकण्यास मिळते , त्याची जाण शाळेत शालेय वयात आपल्यात नसते. जेव्हा केव्हा आपण आपले करिअर करण्यास सुरुवात करतो न कंटाळता सर्व मुला मुलींनी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे. प्रारंभी शालेय मुलांचे विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन रांगोळी प्रदर्शनाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यांच्याच हस्ते पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रस्ताविक विद्यार्थिनी प्रतिनिधी आयेशा मुल्ला हिने केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख व त्यांचा सत्कार करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बौद्धिक,कला, विशेष प्राविण्य व क्रीडा स्पर्धा यशवंत गुणवंत मुला मुलींना उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर कनवाडकर, सचिव अजित पाटील, संचालक राजेंद्र आलासे, संचालिका सौ विजया पाटील, सौ जयश्री थोरात, हेरवाडच्या सरपंच सौ रेखा जाधव, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मातापालक व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी अजीम जमादार याने मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा