अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करणार्या पत्नीसह आठजणांना जन्मठेप
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
अनैतिक प्रेमसंबधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून काटा काढला. हत्येचा प्रकार उघड होऊ नये, म्हणून पतीचं शीर धडावेगळं करून ते वारणा नदीत फेकून दिलं. कोल्हापुरात २००१ साली हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोर्टाने मृत व्यक्तीच्या पत्नीसह ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचं कळताच, आरोपीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलीसांनी कडक बंदोबस्तात सर्व आरोपींना कारागृहात नेलं. कोर्टाच्या या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा