कुरुंदवाडमध्ये १ फेब्रुवारी रोजी वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान
कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन व पत्रकार दिनाचे औचित्य साधून कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता गिरीष सिनेमा हॉल कुरुंदवाड येथे
महाराष्ट्रातील नामवंत युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे तणावमुक्त जीवन जगा या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती तसेच माजी नगराध्यक्ष दादासो पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.
यावेळी शहराच्या वैभवात योगदान दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे या़ंचा 'कुरुंदवाड भूषण' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
तसेच शहर व परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय माळी, शेतमजूरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व निराधारांचा आधार बनलेले सुरेश सासणे, माजी नगराध्यक्षा त्रीशला जवाहर पाटील, साधना म़ंडळ, हेरवाडचे माजी सरपंच सुरगोंडा पाटील, आदर्श मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, आदिती निकम आदींचा समावेश आहे.
यावेळी युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांचे तणावमुक्त जीवन जगा या विषयावर व्याख्यान होणार आहे.कार्यक्रमास तहसिलदार अपर्णा मोरे, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मुख्याधिकारी आशिष चौहान, शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख बाबासो सावगांवे, कृती समितीचे अध्यक्ष सुनिल कुरुंदवाडे, दिपक कांबळे, योगिनी पाटील, सुमन पाटील, भाग्यश्री अडसूळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा