विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : पालकमंत्री नामदार दीपक केसरकर

 

जयसिंगपूरात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

माजी राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार आमचे सहकारी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि त्यांचे बंधू जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात चांगले काम सुरू असून जयसिंगपूर शहर तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी दिली, जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 8 व शाहूनगर परिसरात शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र दवाखान्याचे व जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते एसटी बसस्थानक या 

मार्गावर असणाऱ्या ओढ्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने उपस्थित होते,येथील रेल्वे स्टेशन ते एसटी स्टँड रोडवरील दत्त मंदिर नजीक असणाऱ्या ओढ्यावरती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 81 लाख 42 हजार रुपये खर्चाचा नव्याने पूल बांधण्यात आला आहे. या पुलामुळे शहरासह रेल्वे स्टेशनच्या उत्तर बाजूला असणाऱ्या गावातील नागरिकांची वाहतूक सुलभ झाली आहे. या पुलाचे उदघाटन, नागरी आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र दवाखान्याचे उदघाटन व गल्ली नंबर 4 दिगंबर जैन मंदिरा शेजारील पार्श्वनाथ चौकाचे उदघाटन गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, बाळासाहेबांची शिवसेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने उपाध्यक्ष सतीश मलमे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे,तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, तालुका वैद्यकीय अधिकारी पी सी पाखरे, डॉक्टर पांडुरंग खटावकर, डॉक्टर स्मिता खंदारे, बांधकाम विभागाचे आप्पासाहेब मडिवाळ, डॉक्टर रियाज मुजावर, तलाठी अमोल जाधव,नगरसेवक संभाजी मोरे,राजेंद्र नांदरेकर, राजेंद्र आडके, सर्जेराव पवार, अर्जुन देशमुख,राहुल बंडगर,महेश कलगुटगी,शिवाजी कुंभार,बजरंग खामकर,बाळासाहेब वगरे,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर माजी नगरसेवक आपासाहेब खामकर,अजित उपाध्ये यांच्यासह बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकारी, नगरपरिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष