शिरोळमधील त्या उपनगरास छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे असे नामकरण करण्याची मागणी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील प्रभाग क्रमांक ३ मधील उपनगर परिसरास देण्यात आलेल्या राष्ट्रपुरुषांच्या नावाला आदरयुक्त सन्मान राहावा, याकरिता
शहरातील उपनगराला छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे अशी नावे देण्यात यावीत. याबाबत येत्या 26 जानेवारीच्या सभेत तसा ठराव करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह अशोकराव कांबळे यांनी केली आहे.
याबाबत शिरोळ नगरपरिषदेचे लोकनियुक नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही नगरपालिकेच्या माध्यमातून करू असे आश्वासन दिले. सामाजिक युवा कार्यकर्ते
अमरसिंह कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनिल कुंभार, विकास सुवासे, प्रताप जगदाळे, सतिश जावीर,शिवा जयन्नावर ,शेखर शिंदे, सनी शिंदे, शिवा कामेरीकर, विक्रम कांबळे, राहुल गवळी, अर्जुन राजमाने, उमेश भोसले ,प्रदीप कांबळे यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन मधील युवक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शिरोळ येथील प्रभाग क्रमांक ३ मधील उपनगरास शिवाजीनगर व संभाजीनगर असे यापूर्वी नामकरण करण्यात आले आहे. राष्ट्रपुरुषांच्या सन्मान प्रित्यर्थ नामोल्लेख झाला पाहिजे. राष्ट्रपुरुष म्हणजे आमचे दैवत व स्फूर्ती स्थान असल्याने या उपनगराला छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे असे आदरयुक्त नामकरण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा