शिरोळ : ऐन हिवाळ्यात पावसाची हजेरी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु असता सर्वत्र थंडीचा कडाका वाढत असताना शिरोळ तालुक्यात बुधवारी सायंकाळी काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाने आपली हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे हा पाऊस शेतकर्यांना मारक ठरला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायबच आहे.नागरिकांना उकाडा जाणवत असताना आज बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ : ४५ वाजण्याच्या सुमारास पाऊसाची रिपरिप सुरू झाली. नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी दुकान, घराचा आडोसा घेत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा