धर्माचे आणि देशाचे रक्षण करणारी पिढी घडवा : १०८ आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्याचे युग हे अर्थकारणाचे असून यामध्ये सत्ता आणि संपत्ती यांचा जास्त प्रमाणात प्रभाव दिसतो आहे, अशा परिस्थितीत जैन बांधवांनी संसारिक जीवन जगताना अतिमोह वृत्ती सोडून आत्मकल्याण कसे मिळेल असे आचरण करावे, लहान मुलांच्या वर चांगले संस्कार देऊन भविष्यात ती मुले धर्माचे आणि देशाचे रक्षण करतील असे आदर्श नागरिक व उद्याची पिढी घडवा असे मौलिक मार्गदर्शन परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांनी केले, येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि श्री कल्पद्रुम आराधना महामंडल महामहोत्सव समितीच्या वतीने आयोजित विधान महोत्सव, विश्वशांती महायज्ञ महोत्सवात ते मंगल प्रवचन देत होते, दरम्यान महोत्सवास सौ.मिनाक्षी रावसाहेब पाटील बोरगांवकर दक्षिण भारत जैन सभेचे डॉक्टर अजित पाटील शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती राजगोंडा पाटील आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली मुनीश्रींचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले, यावेळी सौ.मिनाक्षी पाटील बोरगावकर यांनी आहारासाठी 51 हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल महोत्सव समितीच्या वतीने सौ. विनोदिनी शिखरे यांच्या हस्ते त्यांना पार्श्वनाथची प्रतिमा व वस्त्रदान देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच महोत्सवास वीट दिल्याबद्दल जिनेन्द्र मगदूम यांच्या हस्ते त्यांना पार्शनाथाची प्रतिमा व वस्त्रदान देऊन सन्मानित करण्यात आले, परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज पुढे म्हणाले मनुष्याने चांगले भाव ठेवावेत जीवदया यांच्या बद्दल आदर द्यावा, दुःखाला कारणीभूत ठरेल असे कृती करू नये, जो जिनवाणीचे तंतोतंत पालन करतो तोच जैन धर्माचा प्रसार व प्रचार करतो, संसारिक जीवन जगताना मनुष्याने पैसा व संपत्ती नक्कीच मिळवावी त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि चारित्र्यही मिळवावे असेही त्यांनी मार्गदर्शन केले, यावेळी परमपूज्य गुण सागरजी महाराज म्हणाले जैन हा शेती आणि व्यापार करणारा समाज आहे, युवा पिढी ही समाजाची शान आहे, लहानपणी त्यांच्यावर चांगले संस्कार करावे, मुले-मुलींनी कोणत्याही मोठ्या पदावर कार्यरत असला तरी आपल्या आई-वडिल आणि गुरूंना विसरू नये, आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच मुला-मुलींनी विवाह करावेत असेही ते शेवटी म्हणाले, महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे मंगलनाद होऊन सौधर्म इंद्र इंद्रायणी प्रकाश मगदूम व सौ.भारती मगदूम, मुख्य चक्रवर्ती प्रदीप उरसुटे व सौ. सुनिता उरसुटे यांचे मिरवणुकीने सभामंडपा पर्यंत आगमन झाले, मिरवणुकीने जलकुंभ आणण्यात आला, सकाळच्या सत्रात धर्मसभा मंडपातील समवशरणासमोर भगवंतांच्या वर पंचामृत अभिषेक शांतीधारा अत्यंत मंगलमय आनंदमय धार्मिक वातावरणात प्रतिष्ठाचार्य संदेश उपाध्ये यांच्या हस्ते असे मांगलिक विधी संपन्न झाले, दुपारी जीन मंदिरात यजमान यांच्या हस्ते धार्मिक विधीचे होम हवन करण्यात आले, सायंकाळी कुबेराद्वारे रत्नवृष्टी करण्याची सवाल बोली संपन्न झाली, सायंकाळची निघालेली दिग्विजय यात्रा श्रावक श्राविकांना धार्मिक वातावरणात आनंद देणारी व विलक्षण अशी ठरली, रात्री संगीतकार सचिन चौगुले उदगांव यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अनेक श्रावक श्रावकांनी घेतला, महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर समितीचे सर्व सन्माननीय सदस्य वीर सेवा दल वीर महिला मंडळ आणि स्वयंसेवक या सर्वांनी तिसऱ्या दिवशीचे हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रम घेतले. शनिवार सुट्टी असल्यामुळे श्रावक श्राविकांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा