निष्ठापूर्वक भक्ती केल्यास सुखाची प्राप्ती होते : परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
संसारिक जीवनात मनुष्याने भगवंताचे नामस्मरण अथवा भक्ती अत्यंत शुद्ध हेतूने, तना मनाने आणि निष्ठापूर्वक केली तर संसारात सुखाची प्राप्ती नक्की होते, मनाने भगवंतांच्या जवळ जाऊन आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करा सुख तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही असे मौलिक मार्गदर्शन नांदणी संस्थांनचे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केले, येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पदृम आराधना महामंडल महामहोत्सव समितीच्या वतीने आयोजित आराधना महामहोत्सवामध्ये ते मंगल प्रवचन देत होते, ते पुढे म्हणाले प्रत्येक श्रावक श्रावकांनी निष्ठापूर्वक भगवंताचे नामस्मरण करावे,भगवंताला हृदय स्थानी ठेवून त्याची मनोमन भक्ती करावी,आई-वडिलांनी लहान मुलांना मुनीश्रींचे दर्शन घडवून नित्य स्वाध्याय जिनवाणीचे ज्ञान द्यावे, चांगली सुसंगत व साधूंचे आशिर्वाद यामुळे दुर्गुणाचा नाश होऊन सदगुणाची वाढ होते, प्रत्येकाने धार्मिकता जोपासत जैन शास्त्राचे आचरण आणि पालन करावे, आपल्या मुला मुलींना मौलिक शिक्षणा बरोबर धार्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगून जयसिंगपूर येथे होत असलेला आराधना विधानमहोत्सव जयसिंगपूर पंचक्रोशीत मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे, या महामहोत्सवा मध्ये सर्वच भागातील श्रावक श्राविका उपस्थित राहून पुण्यप्राप्तीचे काम करीत आहेत, जयसिंगपूर ही पावनभूमी असल्याने येथे अनेक साधू येत आहेत, शहरात यापूर्वी अनेक मोठ्या प्रमाणातील धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत, पुढील वर्षी नांदणी तालुका शिरोळ येथे भगवान आदिनाथ मूर्तीवर महामस्तकाभिषेक नऊ दिवसाचा सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले, दरम्यान अरिहंत उद्योग समूह बोरगांवचे उत्तम रावसाहेब पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम. पाटील, संचालक जयपाल कुंभोजे यांनी महोत्सव स्थळी भेट देऊन मुनिजींचे आशिर्वाद घेतले, यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या सर्व मान्यवरांचा पार्श्वनाथाची प्रतिमा आणि मंगल वस्त्र देऊन त्यांचे स्वागत व सन्मान केला, सोमवारी पाचव्या दिवशी पहाटे मंगल नादाने सुरुवात होऊन सौधर्म इंद्र इंद्रायणी, मुख्य चक्रवर्ती यांचे मिरवणुकीने आगमन झाले, मिरवणुकीने जलकुंभ धर्मसभा मंडपात आणण्यात आला, आराधना महोत्सव अंतर्गत बीजाक्षर भगवंता वर पंचामृत अभिषेक शांतीधारा अत्यंत मंगलमय धार्मिक वातावरणात विधी संपन्न झाला,यामध्ये सौधर्म इंद्र इंद्रायणी, मुख्य चक्रवर्ती,श्रावक श्राविकांनी समवशरण आणि ध्वजाला प्रदक्षिणा मारून जप व आरती केली, बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी हेलिकॉप्टर द्वारे जीन मंदिर व धर्मसभा मंडपावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, तर शुक्रवारी रथोत्सव होणार आहे, श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पद्रुम आराधना महामहोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर मंदिर ट्रस्टी व महामहोत्सव समितीचे सर्व सदस्य, वीर सेवा वीर महिला मंडळ चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक नऊ दिवस सुरू राहणाऱ्या या महोत्सवासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा