हेरवाड : तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी गिरीष पाटील यांचा अर्ज दाखल
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी संपली, पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आणि गांवचा कारभार पहायला सुरुवात केली आहे. मात्र अजून निवडणूकीचा गुलाल ताजा असताना गावात तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी हालचाली गतिमान झाल्या असल्याने यातच आता माजी तंटामुक्त अध्यक्ष गिरीष पाटील यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राजश्री शाहू आघाडीला एक हाती सत्ता मिळवण्यात यश आले होते. यावेळी त्यांनी गावसभेत एकमताने बाबुराव माळी यांची तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी निवड केली होती. त्यानंतर सलग पाच वर्षे तंटामुक्त अध्यक्ष पदाची सूत्रे बाबुराव माळी हे सांभाळत आहेत. नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाबुराव माळी हे बहुजन ग्राम विकास आघाडीत दाखल झाले आहेत. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्ष बदलणार की तोच राहणार ? याकडे सर्वांचे नजरा लागून राहिल्या असून सध्या तरी गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याचे समजते. यातच गिरिष पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने गावात तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा