ऑनलाईन बैलजोडी मागविणाऱ्या शेतकऱ्याची ९५ हजाराची फसवणूक
मुंबई / वृत्तसंस्था :
ऑनलाइन वस्तू खरेदीच्या नावावर फसवणूक झाल्याच्या घटना आपण अनकेदा पाहत असतो. बीड जिल्ह्यात मात्र चक्क ऑनलाईन बैल खरेदी करण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 95 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
या शेतकऱ्यांने फेसबुकवरील जाहिरात पाहून खरेदीसाठी बैलजोडी बुक केली होती. त्यानंतर समोरच्या अज्ञात व्यक्तीने या शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कामासाठी 95 हजार रुपये आपल्या खात्यावर टाकायला सांगत, बैलजोडी न देता त्याची फसवणूक केली आहे. ज्ञानेश्वर दगडू फरताडे (रा. कारी, ता. धारूर) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा