अमरसिंह कांबळे राज्यस्तरीय आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांना आदर्श फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने पर्सन ऑफ द इयर 2023 अंतर्गत राज्यस्तरीय आदर्श युवा समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कराड येथे सौ वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षक माजी आमदार भगवानराव साळुंखे व सिने अभिनेत्री मीनल ढापरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अमरसिंह कांबळे यांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र, कोल्हापुरी फेटा देऊन गौरव करण्यात आला.यावेळी यशोगाथा या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ दीपक निकम, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर जंगम, सामाजिक कार्यकर्ते विलास आंग्रे, एकपात्री नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान, सिने अभिनेते दगडू माने यांच्यासह अशोकराव कांबळे, निवास कळसे, विजय लोहार, वंदना लोहार, विक्रम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, समाजातील आदर्श व गुणीजन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करण्याची परंपरा आदर्श फाउंडेशन ने जोपासली आहे, हे कार्य कौतुकास्पद आहे.
समाजात अजूनही काहीजणदुर्लक्षित आहेत. अशा व्यक्ती व संस्थांचाही सन्मान झाला पाहिजे असे सांगून त्यांनी शिक्षण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षणाचे धोरण याविषयी राज्यभर लोक चळवळ उभी करीत आहे.या लढ्याला भक्कम पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सिनेअभिनेत्री मीनल ढापरे म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहेत. पण ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. स्वतः मी मेहनत घेऊन शासनाकडून खेळातील सन्मानाचा पुरस्कार व बंगला मिळविला . त्याशिवाय कलाक्षेत्रात ही मला करियर करीत आहे. त्यामुळे जिद्द ,चिकाटी आणि मेहनतीशिवाय कोणतेही यश मिळू शकत नाही असे सांगून त्यांनी आदर्श फाउंडेशन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा