बेडकिहाळ येथे 18 फेब्रुवारी रोजी सर्वधर्मीय वधू वर व पालक मेळाव्याचे आयोजन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बेडकिहाळ येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या बेडकिहाळ नगरीत सर्व धर्मीय वधु वर सुचक केंद्र बेडकिहाळ, आधार सामाजिक सेवाभावी संस्था बेळगाव जिल्हा व माननीय श्री एल आर कोळी प्रांताध्यक्ष अखिल भारतीय समाज केंद्रीय कार्यालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने बेडकिहाळ येथे सर्व धर्म वधू वर पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बेडकिहाळ तालुका निपाणी येथील आधार सामाजिक सेवा संस्था बेळगाव जिल्हा यांच्या सहकार्याने सर्व समाजातील वधू वर यांना एकत्रित अनण्या पाठीमागचे कारण म्हणजे आज प्रत्येक समाजातील युवा युवतींना विवाह संबंधित अनेक समस्या निर्माण होताना दिसुन येत आहेत.या समस्यांचे एकाच व्यासपीठावर विचार विनिमय व्हावे यासाठी सर्व धरमिय वधु वर सुचक व मार्गदर्शकांच्या सहयोगाने बेडकिहाळ येथील बी.एस कंपोझिट जुनिअर कॉलेज बेडकिहाळ येथे शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान सर्वधर्मीय वधु वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी सहभागी होणारे इच्छुक पालकांनी मुला मुलींना बरोबर घेऊन येणे आवश्यक आहे. येथे वेळी बायोडाटा व पोस्टकार्ड साईज फोटो घेऊन येणे गरजेचे आहे
हा कार्यक्रमासाठी दतात्रय पाटील - उद्योजक कोल्हापूर, डॉक्टर सुमित्रा पाटील संस्थापिका नंदिनी गारमेंट व एसडी कार्पोरेशन कोल्हापूर, प्रकाश कदम - प्रसिद्ध वक्ते लेखक कवी शिक्षक कोगनोळी, मा दादासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते बेडकिहाळ,अण्णा पाटील, नागेश शेजाळे ,सुभाष पाटील ,अनिल हेगडे ,सविता पाटील, डॉक्टर दिलीप नेवसे, सौ माधवी यादव ,मा रोहीदास ,आपासाब पाटील,व्ही के कदम,जीवन यादव सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्व समाजातील इच्छुक उमेदवारांचे विवाह जुळण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, या मेळाव्याच्या माध्यमातून इच्छुकांचे शिक्षण, आर्थिक परिस्थिती,कुटुंबातील सदस्य राहणीमान याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यामुळे आपला जोडीदार व योग्य साथीदार निवडण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक डॉ विक्रम शिंगाडे यांनी एका पत्रिका द्वारे दिली आहे, तरी सीमा भागातील सर्व तरुण वधू-वराने या सर्वधर्मी वधु वर व पालक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा