संजय घोडावत यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस; अभिनेता प्रसाद ओक यांची उपस्थिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर:घोडावत विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता उद्योजक संजय घोडावत यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी अभिनेता प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
यावेळी विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन 'उमंग' चे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन शो,गायन याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. त्याचबरोबर कला, क्रीडा,संस्कृती,साहित्य, उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला 'एसजीयु आयकॉन 2023' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेहसंमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा