खिद्रापूर, सैनिक टाकळी, अकिवाट आणि मजरेवाडीत 761 जणांचे रक्तदान
राहूलजी घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कायम सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे राहूलदादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज झालेल्या शिबिरात 761 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया.. या टँगलाईनखाली राहूल घाटगे यांनी सन 2020 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन आपल्या वाढदिवसानिमित्त करतात, याला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात खिद्रापूर येथे 104, अकिवाट येथे 251, सैनिक टाकळी येथे 227, मजरेवाडी येथे 179 असे एकुण 761 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा