राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन
पुरग्रस्तांचा आसरा असो, शेतकऱ्यांचा दुवा असो किंवा समाजातील सर्वसामान्य नागरीकांपासून शिरोळ तालुक्यातील जनतेचा आधार असो गुरुदत्त कारखाना नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतो, हेच समाजकार्य राहूल घाटगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरु ठेवले आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरीकांचा प्राण वाचवून रक्ताची नाती जोडण्याचे काम राहूल घाटगे यांच्या माध्यमातून होत असून त्यांच्या या रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे शिरोळ तालुक्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात कौतुक होत आहे. सन २०२० साला पासून त्यांनी या सामाजिक उपक्रमाला सुरुवात केली.
२०२० साली १०४० जणांनी रक्तदान केले. सन २०२१ रोजी २०२१ जणांनी, २०२२ साली ३०२० जणांनी रक्तदान करुन या उपक्रमाला मोठी साथ दिली. यावर्षी ४०१० रक्तबाटल्यांचे संकल्प असून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चला माणूसकीवर प्रेम करुया.... रक्तदानातून जीवदान देवूया. या टॅगलाईनखाली राहूल घाटगे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यात रक्तदान शिबिरचा संकल्प रुजविला आणि बघता बघता या शिबिराला गावा-गावातून प्रतिसाद मिळत गेला. यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी खिद्रापूर येथील टाकळी
येथील माजी सैनिक समाज कल्याण हॉल, अकिवाट येथील बसव मंडप, मजरेवाडी येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह. १३ रोजी राजापूर व राजापूरवाडी येथे नवीन अमोघसिध्द मंदिर, नवे दानवाड येथील हनुमान मंदिर, जुने दानवाड येथील ब्रम्हमानाथ मंदिर, टाकळीवाडी येथील मा. बाळासाहेब माने सभागृह. १४ रोजी दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार हॉल, गांधी चौक, घोसरवाड येथील मरगुबाई - दुरुगबाई मंदिर, हेरवाड येथील ग्रामपंचायत सभागृह, बस्तवाड येथील हॉल, चिंचवाड येथील हनुमान मंदिर हाळ चिंचवाड, टाकळीवाडी येथील कारखाना साईट या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा