स्वतःमधील जिद्द आणि चिकाटी आयुष्य यशस्वी बनवेल : विशाल लोंढे

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

समाज, देश पुढे जायचा असेल तर महिला सक्षम आणि स्वावलंबी असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने समाजात प्रयत्न व्हायला हवेत. मुलींनी स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. जे करिअर करणार आहे, त्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी नक्कीच तुमचे आयुष्य यशस्वी बनवेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. तिटवे ता. राधानगरी येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांतील विविध संधी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.

     ते पुढे बोलताना म्हणाले, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करा, त्यातून आयुष्याबद्दलचे चांगले निर्णय घ्या. स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी जगा. कारण जेंव्हा तुम्ही स्वतःसोबत समाजाची प्रगती कराल तेंव्हा आपल्या देशाची प्रगती अधिक झपाट्याने होईल. आपल्याला मिळालेल्या भौतिक साधनांचा योग्य वापर करून आपण यश मिळवू शकतो. तसेच परिस्थितीवर मात करून एका सामान्य व्यक्ती पासून आपण एकाद्या जिल्ह्याचा कार्यभार सांभाळू शकतो, इतकी प्रचंड शक्ती आपल्यात असते, त्यामुळे नैराश्याला झुगारून पुढे वाटचाल करत राहणेच योग्य, असे मत याप्रसंगी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी अनिल पाटील, दिलीप देसाई, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सानिका पाटील हिने केले तर आभार प्रा. सुप्रिया पाटील यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष