चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया..

दुसर्‍या दिवशीअखेर 1117 जणांचे रक्तदान


जयसिंगपूर/ शिवार न्यूज नेटवर्क

कायम सामाजिक कार्यात अग्रभागी असणारे राहूलदादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या शिबिरात 117 एकुण जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

चला माणुसकीवर प्रेम करुया... रक्तदानातून जीवदान देवूया.. या टँगलाईनखाली राहूल घाटगे यांनी सन 2020 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन आपल्या वाढदिवसानिमित्त करतात, याला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही तालुक्यातील विविध गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 12 रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात खिद्रापूर येथे 104, अकिवाट येथे 251, सैनिक टाकळी येथे 227, मजरेवाडी येथे 179 असे एकुण 761 रक्तदान केले होते, दुसर्‍या दिवशी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये राजापूर 178, टाकळीवाडी 87, नवे दानवाड 39, जुने दानवाड 52 असे एकुण 356 जणांनी रक्तदान केले असून पहिल्या व दुसर्‍या दिवशी एकुण 1117 जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष