घोसरवाडच्या प्राथमिक शिक्षकांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुदत शुगर टाकळीवाडीचे एकझ्युकेटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात कुमार घोसरवाड येथील शिक्षक दत्तात्रय कचरे यांनी ३५ व्या वेळी, स्वतःअपंग असूनही अनिल मंगावे यांनी १४ व्यावेळी, नंदकुमार पोवार यांनी १४ व्या वेळी, दशरथ खोत यांनी ६ व्या वेळी तर विनायक कांबळे यांनी चौथ्यांदा रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
नेहमी शैक्षणिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असणारी कुमार विद्या मंदिर घोसरवाड शाळा रक्तदान करणाऱ्या शिक्षकांची शाळा म्हणून ओळखली जावू लागली आहे. केंद्रीय प्रमुख रमेश शंकर कोळी,मुख्याध्यापक संजय निकम,शामराव कांबळे यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा