पंचमहाभूत लोकोत्सवासाठी हेरवाडकरांनी २३ रोजी भाकरी जमा करण्याचे आवाहन


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सिद्धगिरी मठ महासंस्थानच्या वतीने आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी केलेल्या विविध आवाहनांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावागावांतून शिधा जमा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उत्सव काळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे नियोजन झाले आहे. याच पार्श्वभूमिवर आवाहन केल्याप्रमाणे हेरवाड गावातील ग्रामस्थांनी २३ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात भाकरी जमा करून सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा भाग बनावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवात या उत्सवासाठी पंचवीस राज्यांतून सुमारे पाच लाख भक्तगण येणार असून या भक्तगणांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. 

आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार असून या महोत्सवाला हेरवाड मधील नागरीकांनी ग्रामपंचायत कार्यालयात भाकरी जमा करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष