उद्यापासून तेरवाड मंगरायासिध्द देवाची यात्रा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड ( ता. शिरोळ ) येथील मंगरायासिध्द देवाची यात्रा शुक्रवार ते सोमवार अखेर होत आहे. या यात्रेनिमित्त विविध स्पर्धा, जंगी कुस्त्यांचे मैदान, शर्यती, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष उमेश माळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माहीती देताना म्हणाले, शुक्रवारी पहाटे पाच वाजता मंगरायासिध्द देवाची पालखी मिरवणूक व पंचगंगा नदीवर भाकणूक होणार आहे.
शनिवारी सकाळी मरेथाॅन, रांगोळी स्पर्धा होणार आहेत. तर साडेदहा वाजता श्वान स्पर्धा होणार आहेत. स्वर संगीत मैफिलीचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी विना लाठी काठी घोडागाडी शर्यत होणार आहे. सायंकाळी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून कुस्त्यांचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखाना चेअरमन गणपतराव पाटील व गुरुदत्त साखर कारखाना चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दलितमित्र अशोकराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोमवारी सायंकाळी ग्रामपंचायत क्रिडांगणावर आर्केस्टा आयोजित केला असून सरपंच शशिकला वाडीकर, कुरुंदवाड शहर काँग्रेस अध्यक्ष विजय पाटील, हेरवाड माजी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार असल्याचे यात्रा कमिटी अध्यक्ष उमेश माळगे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आघाडी प्रमुख संजय आनुसे, सरपंच शशिकला वाडीकर. उपसरपंच जालिंदर शाडगे, ज्येष्ठ ग्रा.प. सदस्य विजय गायकवाड,उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, कार्याध्यक्ष अरुण नल्ला, सचिव राजगोंडा मालुमल बंडू उगारे तातोबा पाटील गणपती मगदूम आधी यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होतेउपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा