इचलकरंजी बुध्दिबळ स्पर्धत २०० खेळाडूंचा सहभाग
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना मान्यतेने, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व केन चेस अकॅडमी यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हा मर्यादित महाशिवरात्री निमित्त दि. १८ रोजी घेण्यात आलेल्या १० व १६ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धत ५० शाळांचा सहभाग होता. त्यात २०० शालेय विद्यार्थी सहभागी होते, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त १३ खेळाडूंचा सहभाग होता.
इचलकरंजीत घेण्यान आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेन एकूण ८ फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धा लायन्स ब्लड बैंक हॉल, दाते मळा, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. 6 वर्षा खालील प्रथम क्रमांक - दिव्या पाटील, द्वितीय क्रमांक रियार्थ पोदार, तृतीय क्रमांक- शौर्य बगडिया चतुर्थ - शंतनू पाटील , पाचवा क्रमांक- व्यंकटेश खाडे - पाटील, १० वर्षाखालील प्रथम क्रमांक - प्रेम निचल, द्वितीय क्रमांक- अर्णव पाटील, तृतीय क्रमांक- वेदान बांगड , चतुर्थ क्रमांक. सिद्धी कर्व, पाचवा क्र.- आदित्य घाटे, उत्तेजनार्थ ७ वर्ष खालील मुले : जुनेद जमादार, द्रिश हेडा, दिव्यांश भराडिया, मुली : अन्वेशा सोनी, रिद्धी भुतडा, क्रिशा बाहेती, ९ वर्षांखालील मुले : अंलकार तेली, द्विज कातृत , राघव भुतडा, मुली - प्रगती बंग, सांची चौधरी, स्वरा पाटणी.
उत्कृष्ट ११ वर्षांखालील मुले . अभय भोसले, विवान सोनी, वरद पाटील, मुली - सिद्धी बुबने, अनिका खंडेलवाल, आराध्या ऋग्गे, उत्कृष्ट १३ वर्षाखालील मुले - वेदांत पुजारी, अथर्व तावरे, तरुण गिरमल, मुली - अरिणा मोदी, संस्कृती सुतार, प्रियदर्शनी ठोमके या सर्वांना रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले उत्कृष्ट स्पोर्टसमनाशिप सन्मानचिन्ह - आरव पाटील, उत्कृष्ट वार्षिक बुध्दिबळ खेळाडू शौर्य बगडीया व अथर्व तावरे खेळाडूना देण्यात आली.
उत्तेजनार्थ उत्कृष्ट केन चेस अकॅडमी खेळाडू अथर्व झाकोटिया, आदित्य कोळी प्रणव कोळी, श्रीतेज गावडे,रियांश उरूनकर (मेडल)
उत्कृष्ट बुध्दिबळ शाळा. अल्फोन्सा स्कुल, यड्राव. पोदार इंटरनॅशनल स्कुल यड्राव. बालाजी विद्या मंदीर इचलकरंजी. डी. के. टी. ई. नारायण मळा, प्राथमिकविदयामंदिर.चंद्रनारायण बलदवा इंग्लिश मेडियम स्कुल जयसिंगपूर , मॉडर्न स्कूल, इचलकरंजी. गंगामाई विद्या मंदीर , समर्थ विद्या मंदीर , मारवल इंग्लिश मेडियम स्कूल, इचलकरंजी, कन्या विदया मंदीर नांदणी, या सर्वाना उत्कृष्ट ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या बुद्धिबळ स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच सौ. आरती मोदी, करण परिट, राज्य पंच रोहित पोळ, विजय सलगर, सहाय्यक पंच सौ आस्मिता नलवडे, संदिप चव्हान, प्रतिमा चंदनशिवे, संदिप पंडित, अमृत तावरे, इंद्रजित कर्वे यांनी उत्कृष्ट काम पाहिले.
.उद्घाटन व बक्षिस समारंभ लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, लेडिज विंग चेअरमन कनकश्री भट्टड, कांता बालर व ब्रेनोबेन प्रमुख रचना बगाडिया, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यां पाहुणेच्या हस्ते संपन्न झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा