तुर्की येथील इंटरनॅशनल युथ काॅन्फरन्समध्ये कनवाडच्या अमन पटेल यांनी मांडली भारताची भूमिका

कनवाड/ शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्यातील मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे अमन फयाज पटेल हे मुळ कनवाड चे रहिवाशी आहेत. तुर्की या देशात नुकताच पार पडलेल्या युनायटेड नेशन अंडर बेस्ट डिप्लोमॅट्स इंटरनॅशनल युथ काॅन्फरन्स मध्ये ते सहभागी झाले होते. या काॅन्फरन्स मध्ये 50 देशातुन 200 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. या काॅन्फरन्स चा विषय होता जागतिक  व्यापार आणि शस्त्र,  अमन पटेल यांनी अगदी मुद्देसुद माहिती देऊन भारताची भुमिका मांडली. ज्या वेळी पटेल यांची निवड झाली होती त्यावेळी शाहु शिक्षण संस्थेच्या संचालिका ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे मॅडम करुंदवाड येथील एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या कि अमन पटेल म्हणजेच कोल्हापूर ची मुलुखमैदान तोफ कोल्हापूर चा आवाज आता दिल्ली मुंबई मध्ये नाही तर तुर्की या देशात घुमणार ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे या म्हणाल्या तशा कोल्हापूर चा आवाज शेवटी तुर्की या देशात घुमला
या काॅन्फरन्स मध्ये भारतातुन फक्त 6 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते . या 6 विद्यार्थ्यांन मधुन महाराष्ट्रातुन अमन पटेल होते.  ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे
या आधी सुद्धा वेग वेगळ्या ठिकाणी पटेल यांची निवड झाली आहे त्यामध्ये खेल मंत्रालय मार्फत घेण्यात आलेल्या युवा संसदेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे व  MIT स्कूल ऑफ गव्हरमेंट मार्फत घेण्यात आलेल्या 11व्या व 12 व्या Indian student parliament मध्ये सुद्धा सहभाग नोंदविला आहे .अमन पटेल हे नॅशनल सोशल युथ आयकॉन गोल्डन अवार्ड चे मानकरी सुद्धा आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष