शेतकर्यांच्या बांधावरून माल खरेदी करून फसवणूक करणार्या व्यापार्यांविरूद्ध कठोर भूमिका - सचिन पाटील
पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :
कृषि उत्पन्न बाजार समितीतून शेती माल खरेदी न करता थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून माल खरेदी करण्याचं प्रमाण मोठया प्रमाणात वाढलं आहे. शेतकरीही अशा प्रकारच्या विक्रीला प्राधान्य देतात. परंतू काही व्यापारी याचा गैरफायदा घेवून लाखो रूपयांचा माल खरेदी करून पसार होतात. अशा वेळेस शेतकर्यांना वसुलीसाठी मोठी अडचण निर्माण होते.
नाशिक जिल्हयाचे पोलीस अधिक्षक म्हणून काम करताना जिल्हयातील फसवणूक झालेल्या शेतकर्यांना मोठया प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम सचिन पाटील यांनी केलं आहे. त्यांनी राबवलेला पॅटर्न संपुर्ण राज्यभर राबविला तर शेतकर्यांची करोडो रूपयांची येणी वसुल होतील. त्यासाठी ग्रीन वर्ल्ड परीवार पुढाकार घेणार आहे असे मत ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलं.
सचिन पाटील सध्या औरंगाबाद जिल्हयात गुन्हे अन्वेशन विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ग्रीन वर्ल्ड कार्यालयात दिलेल्या भेटीच्या वेळी उद्योजक अभिजीत पारखी, वझे, कुलकर्णी, निशिकांत कडबाने, पियुष कोतवाल उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा