आयुक्त देविदास टेकाळे यांची ग्रीन वर्ल्ड कार्यालयाला भेट

पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी ग्रीन वर्ल्डच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. ‘माझी वसुंधरा’ या राज्यशासनाच्या महत्त्वकांक्षी अभियानावर लेखक गौतम कोतवाल यांनी ‘माझी वसुंधरा’ पुस्तकाचं लिखाण केलं आहे.

पृथ्वी, वायु, आकाश, जल व अग्नि या पंचमहाभूतांवर काम करून त्यांचं संवर्धनाचं काम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या अभियानाअंतर्गत करत आहेत. या अभियानात ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामाचा तपशील शासनाच्या साईटवर टाकला जातो. वेगवेगळया प्रकारच्या कामाला मार्क सिस्टीम निश्‍चित करण्यात आली असून वर्षाच्या शेवटी मुल्यांकन करून उत्कृष्ठ काम करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार व आर्थिक रक्कम भेट देवून हे अभियान राबविलं जातं.

ग्लोबल वॉर्मिंग हा जागतिक स्तरावरील प्रश्‍न आहे. महाराष्ट्र शासनाने या अभियानात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका कसा कमी करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं आहे. 

धुळे महानगरपालिकेने या अभियानात उत्कृष्ट काम करून अमृत गटात विभाग स्तरावरील नाशिक विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल ग्रीन वर्ल्ड कार्यालयात त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष