१ मार्च रोजी उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सव्वा लाखाच्या विना लाठी-काठी बैल, घोडा-गाडी शर्यती
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
निपाणी मतक्षेत्रचे युवा नेते, बोरगाव येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष उत्तम रावसाहेब पाटील यांच्या 45 व्या वाढदिवसा निमित्त बुधवारी (ता.1 मार्च) रोजी सव्वा लाख रुपयाच्या विना लाठी- काठी बैलगाडी आणि घोडा गाडी शर्यती आयोजित करण्यात आले आहेत. बोरगाव माळ पट्ट्यावर आयोजित या शर्यती सकाळी ८.३० वाजता होणार आहेत.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ३१ हजार रुपये,२१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहेत. जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १५ हजार,१० हजार आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ११ हजार रुपये, ७ हजार रुपये आणि ५ हजार रुपये व ढाल देण्यात येणार आहे. एक हलका 'ड'गट बिनदाती घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये आणि ३ हजार रुपये व ढाल बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती युडी साईज व वाढदिवस कमिटीने कळविली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा