बेडकिहाळ येथील होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या सौ विनंती घोडके

 हळदी - कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बेडकिहाळ- येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या  बि एस संयुक्त पदविपूर्व कॉलज च्या भव्य पटांगणावर बुधवार (ता २३) रोजी उत्तम आण्णा पाटील युवा शक्ती व 'अरिहंत  परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने   हळदी कुंकू व होम  मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      यावेळी निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी निपाणी भागाचे युवा नेते उत्तमआण्णा पाटील, मीनाक्षी रावसाहेब पाटील,निपाणी च्या माजी नगराध्यक्षा  शुभांगी जोशी,धनश्री उतम पाटील, विनयश्री अभिनंदन  पाटील, जनगौडा धड्ड पाटील,सुदर्शन खोत, बाबासाहेब खोत,संजय पाटील, सचिन पाटील, अब्दूलकादिर पटेल,निरंजन पाटील, यांच्या प्रमुख उपस्तीत झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी स्वागत व प्रास्थाविक दत्त साखर कारखान्याचे उपाध्यक्ष  इंद्रजित  पाटील यांनी केले. तर बोरगांव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या संचालीका मीनाक्षी पाटील, शुभांगी जोशी, उत्तम पाटील व  मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजवलन करण्यात आले. तर उत्तम अण्णा पाटील,व उत्तम युवा शक्ती यांच्या वतीने २१ फुटाचा हार सर्व मान्यवरांना घालून सत्कार करण्यात आला.
    उत्तम पाटील यांनी ग्राम दैवत श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन, सर्कल मार्गावरील डॉ आंबेडकरांच्या पुळतळ्यास मालार्पण करून महामानवाना अभिवादन केले.
     या प्रसंगी मीनाक्षी पाटील, सुदर्शन खोत, परशुराम कदम, यांनी मनोगत व्यक्त केले, तर युवा नेते उत्तम पाटील म्हणाले केवळ राजकारण न करता आपण समाज हिताचे कार्य करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी  सातत्याने प्रयत्न शील राहणार आहोत.आम्ही  आपल्या कार्यकर्त्याना बळ देण्याचे कार्य गेल्या चार पाच वर्षा पासून करत आहोत,या पुढे बेडकिहाळ गांवच्या विकासासाठी आधीक लक्ष देऊन गांवातील सार्वजनिक विकास साधण्यासाठी प्रयन्त शील आहोत. भविष्यात  आपली साथ अरिहंत च्या पाठीमागे   राहो कारण गढूळ  राजकारण मोडून काढण्यासाठी आपला आशीर्वाद महत्वाचे आहे. 
कार्यकमाचे अध्यक्ष  माजी आमदार  सुभाष जोशी म्हणाले विविधागीं कार्य करणारे बोरगावचे उत्तम पाटील हे जनतेची  एक ताकद व शक्ती आहेत. पर्मनंट म्हणून पणाचा ठेबां मीरविणाऱ्यांना उत्तम पाटील हे त्यांना  चागंला धडा शिकवतील.
      होम मिनिस्टर  कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.यावेळी  होम मिनिस्टर  च्या दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या धनश्री तेरदाळे ह्या ठरल्या तर सन्मती हेब्बाळे तिसरा क्रमांक पटकाविल्या, व सुमती पाटील यांनी  चौथ्या  क्रमांक मिळविल्या व मोनिका शिंदे पाचव्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या.विजेत्या सर्व स्पर्धक महिलांना मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, वैशाली पाटील,पूजा पाटील,राजश्री पाटील,आसिया परवीण जुनेदी पटेल,व श्रीमती हेमलता पटेल यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  या कार्यक्रमास बेडकिहाळ व परिसरातील हजारो संख्येने महिला उपस्तीत होत्या.
तर  सूत्रसंचलन  कुंथल वडेर,त्रिशला भागाजे यांनी केले. तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष