बंडू पाटील यांच्या पुढाकारामुळे दर्ग्याकडे जाणारा मार्ग झाला पूर्ववत
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील जागृत देवस्थान असणार्या हजरत शमनामिराबाबा वली यांचा ऊरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, या दर्ग्याकडे जाणारा रस्ता संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर मुरमाचे ढिग टाकल्याने दर्ग्याकडे जाणार्या भाविकांना याचा त्रास होणार असल्याने सदर दर्ग्याकडे जाणारा रस्त्यावर डांबरीकरण किंवा खडीकरण करावे, अशी मागणी गावातील ग्रामस्थांतून होत होती, याची दखल घेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनी पुढाकार घेवून सदरचा मार्ग पूर्ववत केला आहे.
सध्या सलगरे ते हेरवाड रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असताना संंबंधित ठेकेदाराकडून येथील तेरवाड रोडलगत असलेल्या हजरत शमनामिरा बाबांच्या दर्ग्याकडे जाणार्या रस्त्यावर मुरमाचा ढिग टाकला आहे. सध्या दर्ग्याचा उरुस काही दिवसावर येवून ठेपला आहे, मात्र, दर्ग्याकडे जाणार्यासाठी रस्ता नसल्याने भाविकांची मोठी अडचण होणार होती, मात्र, बंडू पाटील यांच्या पुढाकारामुळे हा मार्ग पूर्ववत झाला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा