खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणाऱ्या डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दत्त कारखाना कार्यस्थळावर संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रेमकुमार राठोड यांनी संघाच्या निवडणुकीचे काम पाहिले
माजी आमदार स्वर्गीय डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संघाची दैदिप्यमान प्रगती झाली आहे या संघावर डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील गटाचे वर्चस्व अबाधित आहे डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांच्या निधनानंतर त्याचे सुपुत्र दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी यांनी सर्व सहकारी संस्थांचे नेतृत्व करत असताना या संस्थांच्या निवडी बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले त्यामुळे अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या
डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 17 जागांसाठी 17 अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमकुमार राठोड यांनी या संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून नवनिर्वाचित संचालकांची नावे जाहीर केली
संघाचे नूतन बिनविरोध संचालक मंडळअसे सहकारी संस्था प्रतिनिधी गट-उदयसिंह बाळासो जगदाळे(शिरोळ)सुरगोंडा नरसगोंडा पाटील(उदगाव)शामराव गणपती पाटील (कुटवाड) रावसो मल्लाप्पा चौगुले (शेडशाळ)मोहन परसा ढवळे (राजापूर)सुनील आकाराम पाटील (मौजेआगर) गजानन महादेव करे (अर्जुनवाड)
व्यक्ती सभासद प्रतिनिधी गट- गणपतराव आप्पासाहेब पाटील (जयसिंगपूर )रघुनाथ रामचंद्र म्हेत्रे( नांदणी) सज्जनसिंग कृष्णसिंग रजपूत
( नवेदानवाड )दादासो खुबाण्णा देवताळे (गणेशवाडी )राजाराम बापूसो रावण (औरवाड)
महिला प्रतिनिधी गट- सौ अर्चना अनंत धनवडे( नृसिंहवाडी )
सुरय्याबेगम मुनाफ़अह्मंद जमादार (आलास )
अनु जाती / जमाती प्रतिनिधी गट- महेश राजाराम कांबळे( जांभळी)
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी गट- अशोक बिरू धनगर (कोथळी )
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट- साताप्पा गुंडू बागडी (कुरुंदवाड)
दरम्यान श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर संघाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल संघाचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा नूतन संचालक मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संघाच्या संचालक मंडळात संधी दिल्याबद्दल गणपतराव पाटील यांचे आभार मानून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू असे मनोगत अनेक नूतन संचालकांनी व्यक्त केले
यावेळी बोलताना उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले की स्वर्गीय डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी संघाची स्थापना करून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न केले त्यांनी घालून दिलेल्या कार्याचा आदर्श आणि विचाराचा वारसा नूतन संचालक मंडळ निश्चितपणे पुढे नेऊन संघाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्नशील राहतील संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे असे सांगून नूतन संचालकांचे अभिनंदन केले
यावेळी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सातगोंडा गौराज उद्योगपती अशोकराव कोळेकर नुसिंहवाडीचे माजी उपसरपंच अनंत धनवडे शिवगोंडा पाटील योगेश कुलकर्णी मुनाफअहमद जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा