प्रलंबित असलेल्या नवे दानवाड ते जुने दानवाड रस्त्याचे काम सुरू
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
गेल्या अनेक वर्षांपासून नवे दानवाड ते जुने दानवाड रस्त्याचे काम प्रलंबित होते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती, याची दखल घेऊन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नवे व जुने दानवाड ही दोन्ही गांवे कर्नाटक राज्याच्या सिमेवर असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतून सुरु असते, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे याचा नाहक त्रास वाहन धारकांना सोसावा लागत होता, याची दखल घेऊन माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा