दुधारी लेखणीच्या नादाला लागू नका : दगडू माने
कणेरीमठ येथे पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोळमध्ये पत्रकार एकवटले
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कणेरीमठ येथे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या कोल्हापूर येथील एका चैनल प्रतिनिधीला धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित दोषीवर कारवाई करावी.या मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनाच्या वतीने शिरोळ तहसील व शिरोळ पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांना शनिवारी दुपारी 12 वाजता
निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे, शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र जमावे असे आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ पत्रकार दगडू माने (शिरोळ) यांनी केले आहे.
कणेरीमठ येथे सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव सुरु आहे. सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी कार्यक्रमाचे कव्हरेज चांगल्या पद्धतीने देत आहेत. प्रसार माध्यमांमुळे धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रयोगशील व उपक्रमशील कार्यक्रमांना चांगली प्रसिद्धी मिळत आहे, मीडिया माध्यमामुळेच हा महोत्सव जगाच्या नकाशावर पोहोचविण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. कनेरीमठ मधील धार्मिक कार्यक्रमातून संयम, शिस्त , अहिंसा याबरोबरच जगण्याची दिशा देणारे वैचारिक प्रबोधन केले जाते. मात्र या मठावरील स्वयंसेवकांनी पत्रकारावर हल्ला करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी दुधारी लेखणीच्या व लेखणी सम्राट पत्रकारांच्या नादाला लागू नये असा इशारा देत आहोत. कनेरी मठ लोकोत्सव कार्यक्रमांमध्ये गाईंचा मृत्यू ही वास्तव घटनेचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधीला धक्काबुक्की ,मारहाण आणि धमकावणे असा प्रकार घडला , या गंभीर घटनेची नोंद सरकारने घेऊन पत्रकारावर हल्ला करणाऱ्या स्वयंसेवक व जबाबदार घटकावर तात्काळ कारवाई करावी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायद्याचा अंमल व्हावा. अन्यथा जिल्हा पातळीवर पत्रकारांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असेही माने म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा