कुरुंदवाडमध्ये ठाकरे गट आक्रमक : महाजन यांच्या पोस्टरचे दहन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर बेताल वक्तव्य करून टिका केल्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने येथील थिएटर चौकात महाजन यांचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या पोसटरला जोडे मारुन दहन करण्यात आला. आंदोलनानंतर मोर्चाने पोलिस ठाण्यात जावून सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना निवेदन दिले व महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी केले.
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राजू आवळे, दयानंद मालवेकर, आयुब पट्टेकरी, सुहास पासोबा, मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, तेरवाड सरपंच शशिकला वाडीकर आदी सहभागी झाले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा