संवाद उपक्रमांतर्गत विशाल लोंढे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

      सामाजिक न्याय विभागाने आयोजित केलेल्या संवाद उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह हातकणंगले येथे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोंढे यांनी एक दिवस विध्यार्थ्यांबरोबर वसतिगृहात राहून प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयांवर हितगुज करून त्यांना पुरविण्यात येत असलेल्या सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. स्वतः लोंढे यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी वसतिगृहातील सोयी-सुविधांबाबत समाधानी असल्याच्या भावना विद्यार्थी- विद्यार्थिनींनी लोंढे यांच्यासमोर व्यक्त केल्या.

        समाज कल्याण विभागाची जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुलांच्या आणि मुलींचे शासकीय वसतिगृहे आहेत. तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी स्वतः सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी वसतीगृहात भेट दिली. यावेळी यामध्ये झालेल्या संवादात विद्यार्थ्यांनी आपले विविध अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षा संदर्भात आपले विचार मांडले. यावेळी लोंढे आणि विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. दरम्यान, जयसिंगपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथेही विद्यार्थिनींबरोबर संवाद साधण्यात आला. यावेळी समाज कल्याण निरीक्षक डी.एस पाटील. गृहपाल उत्तम कोळी, सुषमा गडकरी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष