क्रांतिकारक हेरवाड गावाला सर्वतोपरी सहकार्य ः निलमताई गोर्हे
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
विधवा प्रथा बंद करुन हेरवाड गावाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, त्यामुळे या क्रांतिकारी गावाला नेहमीच सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन विधासभा उपसभापती निलमताई गोर्हे यांनी केले.
हेरवाड येथील नुतन सरपंच रेखा जाधव व सर्व सदस्यांनी निलमताई गोर्हे यांनी जाहिर केलेले 11 लाख रुपये निधी हेरवाड गावाला दिल्याबद्दल पुणे येथे त्यांची भेट घेवून आभार मानले, यावेळी निलमताई गोर्हे बोलत होत्या.
यावेळी निलमताई गोरे पुढे म्हणाल्या, हेरवाड गावाने विधवा प्रथा बंदीचा कायदा करुन विधवा महिलांना सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे यापुढेही हेरवाड गांवच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करुन गांवचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सरपंच रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्य विद्या माने, विजयमाला पाटील, भरत पवार, अखतर मकानदार, शितल कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान विधवा प्रथा बंदीनंतर अनेक नेत्यांनी गावासाठी निधी जाहिर केला होता, त्याचा पाठपुरावा करुन हा निधी खेचून आणणार असल्याचे सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा