आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त अकिवाट येथे रक्तदान शिबिर संपन्न
अमोल सुनके / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या70 व्या वाढदिवसानिमित्तभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 11 मार्च रोजी श्री विद्यासागर हायस्कूल अकीवाट येथे करण्यात आले होते. रक्तदान हेच श्रेष्ठदान याचा वसा घेऊन या शिबिरामध्ये साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अखिवाट गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वंदना सुहास पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार, संचालक संजय कोथळी, कुमार रायनाडे, रोहित दानोळे,केतन रायनाडे, हर्षवर्धन होसकल्ले, जयपाल चौगुले, अरुण कोथळी, राजगोंडा पाटील, रावसाहेब नाईक, मोहन ढवळे, अदिनाथ चौगुले, धन्यकुमार पाटील,
सुनील फरांडे, दादा पाटील, सुशांत धात्रे, नाभीराज पाटील, प्रज्वल चौगुले, अभय पाटील, शोधन दानोले, रोहन साजणे व डॉ.राहुल आवाडे युवा सेना शाखा अकिवाट जवाहर स्टॉप, जनता बँकेचे सर्व स्टाफ व टीम यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा