शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील रस्ते बांधणीसाठी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जवळपास 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील रस्त्यांचा आता झपाट्याने कायापालट होणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
मागील दोन ते अडीच वर्षाच्या काळात शिरोळ तालुक्यात रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणून रस्ते मजबूत केले आहेत. आता उर्वरित ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग व राज्य मार्गांसाठी नव्याने 75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे गावागावांना जोडणारे रस्ते आता अधिक मजबूत आणि पक्के होणार आहेत असे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे शिरोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत,
शिरोळ तालुक्यातील खालील रस्त्यांसाठी 75 कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी दिली. निधी मंजूर झालेले रस्ते पुढीलप्रमाणे - शिरोळ तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते सुधारणा करणे (रु.25 कोटी)
1. दानोळी ते उमळवाड ग्रामा 1 ची सुधारणा करणे (1 कोटी), 2. उदगाव ते उमळवाड ग्रामा 2 ची सुधारणा करणे (1 कोटी), 3. नांदणी ते तारदाळ रस्ता प्रजिमा 22 ला मिळणारा रस्ता ग्रामा 11 ची सुधारणा करणे (20 लाख), 4.कनवाड ते म्हैशाळ धरण रस्ता ग्रामा 19 ची सुधारणा करणे (60 लाख), 5. प्रजिमा 23 ते शेडशाळ रस्ता ग्रामा 21 ची सुधारणा करणे (60 लाख), 6. प्रजिमा 23 ते कवठेगुलंद रस्ता ग्रामा 22 ची सुधारणा करणे (60 लाख), 7. इजिमा क्र.43 (दत्त सोया प्रकल्प) ते हरोली प्रजिमा क्र.31 ला मिळणारा रस्ता ग्रामा 62 ची सुधारणा करणे (70 लाख), 8.रामा 153 ते तेरवाड ते संतूबाई माळ ते काळम्मावाडी वसाहत प्रजिमा 32 ला मिळणारा रस्ता ग्रामा 39 ची सुधारणा करणे (40 लाख), 9. टाकळीवाडी ते मजरेवाडी ग्रामा 41 ला मिळणारा रस्ता ग्रामा 40 ची सुधारणा करणे (20 लाख), 10.टाकळीवाडी ते दानवाड ग्रामा 43 ची सुधारणा करणे (70 लाख), 11.दत्तवाड-मलिकवाड नदी पाणवठा रस्ता ग्रामा 45 ची सुधारणा करणे (70 लाख), 12.गौरवाड ते कवठेगुलंद माळ प्रजिमा 23 ला मिळणारा रस्ता ग्रामा 49 ची सुधारणा करणे (50 लाख), 13. रामा 142 ब्लॅक अॅण्ड डेकर ग्रामा 8 ला मिळणारा रस्ता ग्रामा 50 ची सुधारणा करणे (70 लाख), 14. दानोळी प्रजिमा 15 ते धनवडे वसाहत ते प्रतिमा क्र. 16 मिळणारा रस्ता ग्रामा 64 ची सुधारणा करणे (35 लाख), 15. प्रजिमा 38 पासून काळम्मावाडी (दत्तवाड पैकी) प्रजिमा क्रं. 32 मिळणारा रस्ता ग्रामा 65 ची सुधारणा करणे (70 लाख), 16. कोंडीग्रे ते इजिमा क्र. 43 ते कुरडे, टारे वस्ती ते नांदणी रस्ता ग्रामा 69 ची सुधारणा करणे (30 लाख), 17.अकिवाट इजिमा 185 कोळी वसाहत रस्ता ग्रामा 73 ची सुधारणा करणे (70 लाख), 18. इजिमा 183 पासून जोग्याळ वस्ती ते वाळवेकर वस्ती कवठेगुलंद रस्ता ग्रामा 79 ची सुधारणा करणे (50 लाख), 19. प्रजिमा 15 दानोळी पासून दत्त हाळ कुंभोज रस्ता ग्रामा 84 ची सुधारणा करणे (50 लाख), 20. कोथळी समडोळी रस्ता ग्रामा 85 ची सुधारणा करणे (20 लाख), 21. नांदणी पैकी माणगांवकोडी ते खंजीरे मळा ते जयसिंगपूरला मिळणारा रस्ता ग्रामा 87 ची सुधारणा करणे (25 लाख), 22. राजापूर ते कोळी वस्ती ग्रामा 93 ची सुधारणा करणे (25 लाख), 23. कोडिग्रे मंगलनगर मार्गे जांभळी गावापर्यंत जाणारा ग्रामा 96 ची सुधारणा करणे (50 लाख), 24. ग्रामा 89 पासून (अर्जुनवाड) कदमवाडी रस्ता ग्रामा 99 ची सुधारणा करणे (30 लाख), 25. रामा 199 ते दानोळी वारणा धरण वसाहत रस्ता ग्रामा 101 ची सुधारणा करणे (50 लाख), 26. शिरदवाड ते दर्गा (जुने गावठाण) रस्ता ग्रामा 103 ची सुधारणा करणे (50 लाख), 27. बनवाडी ते म्हैशाळी (धरण रस्ता) ग्रामा 109 ची सुधारणा करणे (50 लाख), 28. प्ररामा 06 ते जूना नाका जयसिंगपूर रस्ता ग्रामा 107 ची सुधारणा करणे (30 लाख), 29. आलास कागवाड राज्य हद्द रस्ता ग्रामा 113 ची सुधारणा करणे (60 लाख), 30. जूने दानवाड ते दत्तवाड ग्रामा 118 ची सुधारणा करणे (80 लाख), 31. लाटवाडी ते शिवनाकवाडी रस्ता ग्रामा 66 ची सुधारणा करणे (50 लाख), 32. कुरुंदवाड तेरवाड ते रामा 200 ला मिळणारा रस्ता ग्रामा 124 ची सुधारणा करणे (25 लाख), 33. इजिमा 45 ते जॅकवेलकडे जाणारा रस्ता ग्रामा 125 ची सुधारणा करणे (40 लाख), 34. हेरवाड रामा 153 ते संतूबाई माळ ते ग्रामा 39 ला मिळणारा रस्ता ग्रामा 126 ची सुधारणा करणे (20 लाख), 35. राजापूर ते आवटी वस्ती ते नाईक वस्ती राजापूरवाडी रस्ता ग्रामा 128 ची सुधारणा करणे (55 लाख), 36. शिरोळ अर्जुनवाड रामा 153 घालवाड़ कमत रस्ता ग्रामा 132 ची सुधारणा करणे (50 लाख), 37. शिरोळ सोंडमळी रस्ता ग्रामा 133 ची सुधारणा करणे (50 लाख), 38. रामा 200 टाकळीपासून प्रजिमा 33 पर्यंत रस्ता ग्रामा 135 ची सुधारणा करणे (70 लाख), 39. हेरवाड ते नदी पाणवठा रस्ता ग्रामा 138 ची सुधारणा करणे (25 लाख), 40. हसूर ते कुटवाड ग्रामा 18 ची सुधारणा करणे (50 लाख), 41. जूने दानवाड प्रजिमा 33 ते नदी संगमापर्यंत रस्ता ग्रामा 147 ची सुधारणा करणे (50 लाख), 42. अकिवाट ते विद्यासागर रस्ता ग्रामा 151 ची सुधारणा करणे (20 लाख), 43. रामा 199 ते मेंडवाडा (दानोळी पैकी) ग्रामा 156 ची सुधारणा करणे (20 लाख), 44. यड्राव ग्रामा 10 ते बेघर वसाहत ते पार्वती हौसिंग सोसा. रस्ता ग्रामा 164 ची सुधारणा करणे (20 लाख), 45. शिरटी ते नृसिंहवाडी ग्रामा 24 ची सुधारणा करणे (1 कोटी 20 लाख), 46. शिरटी ते घालवाड ग्रामा 15 ला मिळणारा रस्ता ग्रामा 16 ची सुधारणा करणे (1 कोटी), 47. उदगांव वारणा पुनवर्सन वसाहत ते दत्त कारखाना रामा 142 ला मिळणारा रस्ता ग्रामा 56 ची सुधारणा करणे (25 लाख), 48. कवठेसार समडोळी नदी पाणवठा रस्ता ग्रामा 4 ची सुधारणा करणे (20 लाख), 49. हसूर ते बनवाडी ते कनवाड ग्रामा 83 ची सुधारणा करणे (30 लाख), 50. आगर चव्हाण तळ रस्ता ग्रामा 171 ची सुधारणा करणे (25 लाख), 51.चिपरी ते निमशिरगांव ग्रामा 5 ची सुधारणा करणे (70 लाख).
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गची सुधारणा करण्यासाठी रु.50 कोटीचा निधी मंजुर झाला असून ते रस्ते पुढीलप्रमाणे ः-
1. रामा. क्र. 4 ते संभापूर तासगांव कुंभोज दानोळी जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते प्ररामा क्रं.6 पर्यंत रामा क्रं. 199 कि.मी. 49/00 ते 52/300 रुंदीकरणासह मजबुतीकरणासह सुधारणा करणे (3 कोटी), 2.प्ररामा क्र.6 पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रा.मा.क्र.200 कि.मी. 18/00 ते 20/00 मजबूतीकरणासह सुधारणा करणे. (2 कोटी), 3. परामा क्र. 6 पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रा.मा.क्र. 200 कि.मी. 21/800 ते 26/600 मजबुतीकरणासह सुधारणा करणे. (2 कोटी 50 लाख), 4. प्ररामा क्रं.6 पासून अतिग्रे कबनूर इचलकरंजी टाकवडे शिरढोण मजरेवाडी अकिवाट टाकळी खिद्रापूर रस्ता रा.मा.क्र.200 कि.मी.38/500 ते 40/00 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (1 कोटी 50 लाख), 5. रामा क्र. 153 पासून कुरुंदवाड नांदणी ते प्ररामा क्र.6 पर्यंत प्रजिमा क्रं. 73 कि.मी.3/00 ते 4/700 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (3 कोटी 50 लाख), 6. रामा क्रं. 153 पासून कुरुंदवाड नांदणी ते प्ररामा क्रं. 6 पर्यंत प्रजिमा क्रं.73 कि.मी.9/700 ते 11/00 मजबुतीकरणासह सुधारणा करणे. (2 कोटी 50 लाख), 7. रामा क्र. 200 पासून टाकळी टाकळीवाडी दत्तवाड ते राज्यहद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा क्र.38 कि.मी. 2/500 ते 600 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी), 8. प्ररामा क्र. 6 पासून कोंडिग्रे जांभळी टाकवडे अब्दुललाट रस्ता प्रजिमा क्रं. 108 कि.मी. 4/500 ते 6/200 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी 50 लाख), 9. अब्दुललाट लाटवाडी घोसरवाड दत्तवाड दानवाड प्रजिमा क्रं.32 कि.मी. 2/00 से 7/500 मजबुतीकरणासह सुधारणा करणे. (2 कोटी 50 लाख), 10. अब्दुललाट लाटवाडी घोसरवाड दत्तवाड दानवाड प्रजिमा क्र.32 कि.मी. 7/500 ते 9/500 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (1 कोटी 50 लाख), 11. प्ररामा क्र. 6 पासून कोंडिग्रे जांभळी टाकवडे अब्दुललाट रस्ता प्रजिमा क्रं. 108 कि.मी. 9/500 ते 12/00 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी), 12. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगांव चिंचवाड अर्जुनवाड घालवाड शिरटी शिरोळ रस्ता प्रजिमा क्र.14 रस्ता कि.मी. 15/00 ते 22/00 ची मजबुतीकरणासह सुधारणा करणे (5 कोटी), 13. ओंकारेश्वर मंदीर ते यड्राव कोंडीग्रे धर्मनगर कल्याणवाडी चिपरी ते ग्रामा 5 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्रं.106 कि.मी. 0/00 ते 7/500 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (3 कोटी), 14. इचलकरंजी नाक्यापासून (प्रजिमा 22) टाकवडे नांदणी आडकेवाडी ते रामा क्रं. 200 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्रं. 107 कि.मी. 1/500 ते 4/00 व 6/500 ते 8/150 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (6 कोटी), 15. प्रजिमा क्र.38 पासुन टाकळी दानवाड ते राज्य हद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा क्रं. 33 कि.मी. 0/00 ते 2/00, 3/00 ते 4/400 मजबुतीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी), 16. रामा क्रं. 153 पासून नरसोबावाडी औरवाड कवठेगुलंद माळ गणेशवाडी ते राज्य हद्दपर्यंतचा रस्ता प्रजिमा क्र. 23 कि.मी. 7/00 ते 11/00 (7/00 ते 11/00) मजबुतीकरणासह सुधारणा करणे (2 कोटी), 17. प्ररामा क्र. 6 पासून निमशिरगांव दानोळी कवठेसार ते जिल्हा हद्दपर्यंतचा रस्ता प्रजिमा क्र. 15 कि.मी. 1/800 ते 6/600, 7/500 ते 13/500 रुंदीकरणासह मजबुतीकरणासह सुधारणा करणे (5 कोटी), 18. प्रमुख राज्यमहामार्ग क्रं. 6 ते चिपरी जैनापूर कोथळी ते जिल्हा हद्द हरीपुर ते राज्यमार्ग क्र. 154 ला मिळणारा पर्यंतचा प्रजिमा क्रं. 93.कि.मी.0/0 ते 1/600 मजबुतीकरणासह सुधारणा करणे 1 कोटी 50 लाख.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा