माळी महासंघ हेरवाड शाखेच्या अध्यक्षपदी किसन माळी, उपाध्यक्षपदी दिलीप माळी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
माळी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा हेरवाडची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी किसन माळी, उपाध्यक्षपदी दिलीप माळी, कार्याध्यक्षपदी तुकाराम माळी, सचिवपदी तुकाराम दत्तू माळी तर कोषाध्यक्षपदी श्रीकांत माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील माळी समाजाच्या विकासासाठी माळी महासंघ काम करते. याची शाखा नुकतीच हेरवाड येथे काढण्यात आली व नूतन पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्ष किसन माळी म्हणाले, माळी समाजातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आम्ही सर्व नूतन पदाधिकारी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी नूतन पदाधिकार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माळी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा