कुरुंदवाडमध्ये मानवी साखळीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपले बलिदान दिल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता या पायावरच देशाचे ऐक्य आणि अखंडता टिकून आहे. मानवी साखळीच्या माध्यमातून देशातील ऐक्य अबाधित राखण्याचा संदेश देण्याचे आवाहन प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले.
शहीद दिनानिमित्त येथील राष्ट्र सेवा दल, साधना मंडळ व महात्मा गांधी विचार प्रचार समितीच्या वतीने शहरातील पालिका चौकात मानवी साखळी करुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य कुंभार बोलत होते. यावेळी राष्ट्र सेवादलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांचे भाषण झाले. यावेळी महावीर अक्कोळे, प्रा डॉ तुषार घाटगे,खंडेराव हेरवाडे,सचेतन बनसोडे,प्राचार्य डॉ आर जे पाटील, मिलिंद कुरणे,तानाजी आलासे,रामदास मधाळे, अल्लाउद्दीन दानवाडे, भूपाल दिवटे, रविकुमार पाटील, सुवर्णा यादव,विनायक लोखंडे,शंकर ढोणे,काशिनाथ शिकलगार,आप्पा बंडगर यांचेसह शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, पुरोगामी पक्ष संघटना ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा