पर्यटन विकास योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्याला ५ कोटीचा निधी
नृसिंहवाडीला ३ तर कोथळीच्या कल्लेश्वर मंदिरासाठी २ कोटीचा निधी : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी व कोथळी येथील कल्लेश्वर मंदिरासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार असून या भरीव निधीमुळे नृसिंहवाडी हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र तसेच शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील कल्लेश्वर मंदिर यांच्या वैभवात भर पडणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटले आहे निधी मंजूर केल्या बद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत, नृसिंहवाडीसाठी मंजूर झालेल्या ३ कोटी रुपयांच्या निधीमधून पार्किंग जवळ दुकान गाळे व यात्री निवास बांधण्यासाठी १ कोटी रुपये, गेस्ट हाऊस शेजारी यात्री निवास बांधण्यासाठी ७० लाख रुपये, जोशी भोजनालयाजवळ काँक्रिटीकरण व चार चाकी पार्किंगसाठी ८० लाख रुपये, तर माहेश्वरी मंगल कार्यालगत बनभाग मध्ये मोटर सायकल पार्किंगसाठी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे,
कोथळी येथील कल्लेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी २ कोटीचा निधी मंजूर झाला असून यामध्ये मंदिर परिसरात दुकान गाळे व सभागृह बांधण्यासाठी ३० लाख रुपये, मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, मंदिर परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी ६० लाख रुपये, भक्त निवास इमारत बांधकामासाठी ३० लाख रुपये, मंदिर परिसरातील अंडरग्राउंड गटर बांधण्यासाठी ३० लाख असा शिरोळ तालुक्यातील पर्यटनासाठी ५ कोटी रुपये चा निधी मंजूर झाला असल्याचे सांगताना पर्यटन विभागाच्या वतीने मंजुरी बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे, या सर्व कामांचे इस्टिमेट पूर्ण झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार शेवटी म्हंटले आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा