अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाखाची नुकसान भरपाई

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

२१ ऑक्टोंबर २०२२ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते, अशा नुकसानग्रस्त ३१५८ शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने २ कोटी ७५ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे, सदर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा केली जात असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.

२१ ऑक्टोंबर २०२२ च्या रात्री ना भूतो ना भविष्यतो इतका प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाला होता, यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, आपण स्वतः दुसऱ्याच दिवशी शिरोळ तालुक्यात फिरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती, महसूल व कृषी विभागाला नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत असे आदेश दिले होते, यावर तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, शिरोळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्या माध्यमातून महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गतीने पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्या माध्यमातून शासनास सादर केला होता, भाजीपाला, सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते, यावर शासनाच्या महसूल विभागाने अवकाळी मुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे निश्चित केले आहे, आणि सदरची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यांनी शेवटी म्हंटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष