नवे दानवाड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड येथे शरद सह साखर कारखान्याचे संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ हस्ते विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यामधे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल, नळ पाणी पुरवठा योजने अंतर्गत २ कोटी ३४ लाख रुपये, आरोग्य विभाग योजनेतुन दानवाड उपकेंद्र दुरूस्ती साठी ४ लाख रुपये, कुमार विद्या मंदिर शाळा दुरूस्ती साठी ६ लाख रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते करणे, रावसो बेरड ते सदा एडके (धनगर) शेतापर्यंत पाणंद रस्ता करणेसाठी २३ लाख ८५ हजार, सचिन अंबुपे ते बापुसो मलिकवाडे शेत पांनद रस्ता करणेसाठी २३ लाख ८५ हजार रुपये, संतराम शिंग रजपुत ते घर ते सुरेश घर शिव पांनद रस्ता करणेसाठी २० लाख ८५ हजार रुपये, विरपक्ष आंबुपे घर ते रामा माळी शेता प्रयंत २३ लाख ८५ हजार रुपये या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सरपंच डॉ. सी. डी. पाटील, उपसरपंच सर्व ग्रामपंचायती सदस्य, पोलिस पाटील , गावातील प्रतिष्ठित नागरिक तरूण मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष