चांदोली धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदी प्रवाहित

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

चांदोली धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदी पात्रातील पाणी प्रवाहित झाले असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, मागील आठवड्यात कोयना व राधानगरी धरणातून सुरू केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा पंचगंगा नदी पात्रांमधील पाणी प्रवाहित झाले होते, याच वेळी वारणा नदीवरील चिंचोली बंधाऱ्याच्या पिलर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे चांदोलीतून विसर्ग होऊ शकत नव्हता, सध्या चिंचोली बंधार्‍याच्या पिलरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने चांदोली धरणातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, सध्या विसर्ग सुरू झाल्यानंतर वारणा नदी दानोळी बंधाऱ्यापासून कोथळी पर्यंत प्रवाहित झाली आहे यामुळे वारणा नदीवरील जलसिंचन व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनांणा या पाण्याचा लाभ होणार आहे, त्याचबरोबर राजापूर येथे कृष्णा नदीवर असलेल्या बंधाऱ्याला बरगे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असून यामुळे कृष्णा पंचगंगा व वारणा नदी मधुन होणाऱ्या पाण्याचा विसर्गाचा शिरोळ तालुका आणि महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या नदीकाठावरील सर्व शेतकरी व गावांना होणार आहे,असे सांगताना चांदोली धरणा मधून विसर्ग व्हावा यासाठी आपण सातत्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष