पाणंद रस्त्यांसाठी शिरोळ तालुक्याला सर्वाधिक निधी : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
कवठेसार व दानोळी येथे १४ कोटी २५ लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ
कवठेसार / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील गावा गावांमध्ये सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी मागील अडीच तीन वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून आणता आला याचे समाधान आहे, विविध विकास कामांबरोबरच वर्षानुवर्षे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी समाजबांधव गावापासून बाजूला असलेल्या आपल्या शेतीकडे जेंव्हा जातो तेंव्हा आपल्या शेताकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याची दुरावस्था शेतकरी वर्षानुवर्ष तो सहन करीत होता, शिरोळ तालुक्यातील जवळपास तीनशे किलोमीटर पानंद रस्त्यांसाठी 75 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी आणता आला याचे मोठे समाधान आहे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शिरोळ तालुक्यातील पानंद रस्ते आता मजबूत होणार आहेत, असे उदगार माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कवठेसार येथे बोलताना काढले, येथील १ कोटी ६० लाख ५० हजार रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते, या पानंद रस्त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, त्यांचे सहकारी ग्रामसेवक त्याचबरोबर संबंधित रस्त्यांवरून येणा जाणारे शेतकरी यांनी एकत्रित येऊन त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करून घ्याव्यात व तातडीने रस्त्यांची कामे सुरू करावीत असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले, यावेळी लोकनियुक्त सरपंच पोपट भोकरे, उपसरपंच सौ.जरीना फकीर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश मलमे,सुभाष माने,बशीर फकीर,संतोष भोकरे,बाबासाहेब मगदूम, यशवंत गुरव,रमेश मगदूम,विकास सुतार, आर. डी.पाटील,प्रा.किरण पाटील,भीमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, त्यानंतर दानोळी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ४ कोटी ६१ लाख रुपये खर्चाच्या जल जीवन मिशन अंतर्गत योजनेमधील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ संपन्न झाला, यावेळी दानोळी येथे सरपंच सुनीता वाळकुंजे, उपसरपंच विपुल भिलवडे, ग्रामपंचायत सदस्य रोहित धनवडे, सौ. शोभा गावडे, सौ. पल्लवी केकले, सौ. कल्पना पिसे सौ. सायरा इनामदार, श्रीमती, मंगल दळवी, सौ. सुरेखा कुरणे, सौ. संगीता बोरचाटे, सौ. रुकसाना नदाफ, प्रकाश पाटील, प्रविण खोत, सर्जेराव शिंदे, गोपाळ माने, श्रावण कांबळे, सुनील शिंदे, यांच्यासह शरद साखर कारखान्याचे संचालक रावसाहेब भिलवडे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे, पैलवान केशव राऊत, सतीश मलमे, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राम शिंदे,( सर) माजी सरपंच गुंडू दळवी, बापूसो दळवी, माजी उपसरपंच गबरू गावडे, रामचंद्र वाळकुंजे, केशव राऊत, विजय दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा