गुढीपाडव्याच्या शुभमुर्हूतावर शिरोळ तालुक्यात ७० टक्के विद्यार्थांची पटनोंदणी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या "गुढीपाडवा पट वाढवा" या उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यामध्ये इयत्ता १लीच्या वर्गात प्रवेश घेणारे एकूण दाखलपात्र मुले २०२०व मुली१७९६ एकूण ३८१६ विद्यार्थ्यांपैकी १०२८ मुले व१०४० अशा एकूण२०६८ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. एकंदरीत उत्साहात ७० टक्के विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाडव्याच्या दिवशी आपला प्रवेश निश्चित केला
यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज सुंदर रांगोळी काढलेली होती. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. गुलाबपुष्प,शैक्षणिक साहित्य, खाऊवाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी गट विकास अधिकारी शंकर कवितके, गटशिक्षण अधिकारी दिपक कामत व शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, सर्व केंद्रीय प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा