मानकापुरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध : युवा नेते उत्तम पाटील
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
मानकापूर येथील हजारो महिलांच्या उपस्थितीत उत्तम पाटील युवा शक्ती मानकापूर व अरिहंत परिवार मानकापूर यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी निपाणीचें माजी आमदार श्री सुभाष जोशी यांच्या प्रमुख उपस्तिथीत व निपाणी भागाचे युवा नेते श्री उत्तम आण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते हळदीकुंकू व होममिनिस्टर कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सौ मीनाक्षी रावसाहेब पाटील उपस्थित होत्या , सौ शुभांगी जोशी (माजी नगराध्यक्ष्या निपाणी नगरपालिका) सौ विनयश्री अभिनंदन पाटील व धनश्री उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्तिथी होती
कार्यकमाला उदेशुन बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की आगामी निपाणी विधानसभा निवडणूकीत महिलांचे योगदान महत्वाचे आहेत, मतदार क्षेत्रातील युवक,गुणवंत, विशेषतः महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे मोलाचा वाटा आहे, संकट काळी मदतीला धावून येने हे अरिहंत परिवाराची जवाबदारी आहे असे समजून आंम्ही कार्यरत आहेत. मानकापुरच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन असे युवा नेते उत्तम पाटील यांनी आवाहन केले.
यावेळी मानकापूर येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचे प्रथम क्रमांकाचे फ्रिजचें बक्षीस सौ सपना तळपदे यांना मिळाले ,द्वितीय क्रमांकाचे तिजोरीचे बक्षीस सौ सुप्रिया माळी, तृतीय क्रमांकाचे शिलाई मशीनचे बक्षीस सौ प्रियांका पाटील तर चतुर्थ क्रमांकाचे टेबल फॅनचे बक्षीस सौ सावित्री जाधव, पाचव्या क्रमांकाचे मिक्सरचे बक्षिस स्वाती लोहार,सहाव्या क्रमांकाचे कुकरचे बक्षीस रूपाली जाधव यांना मिळाले, सौ रूपा मेस्त्री यांना सातव्या क्रमांकाचे फॅनचे बक्षीस, उमा पाटील यांना तर 8 ते 15 क्रमांकाचे साडीचे बक्षीस रोहिणी पाटील, माधुरी नाईक, प्रीती पाटील, स्नेहा कांबळे, नेहा बोने, उज्वला साळुंके, तेजस्विनी कमते, निशिगंधा कुंभार यांना मिळाले ,
यावेळी माणकापुर येथील धनंजय माळी, अभय चौगुले, तानाजी मोरे, अर्जुन लष्करे, वैशाली कुंभार, परिणीती बेडकीहाळे, राजू खिचडे सर, व सुनील म्हाकाळे यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमास सौ वैशाली कुंभार ग्राम पंचायत अध्यक्ष माणकापुर व उत्तम आण्णा गट सर्व पंचायत सदस्या व सदस्य, मल्हारी हांडे, मलकारी तेरदाळे, सदाशिव कोळी, विठ्ठल कटेकर, उत्तम बन्ने, मुकुंदराव कुलकर्णी साहेब, तानाजी मोरे, कुशिंद्र कुंभार, राकेश चौगुले, अनिल माळी, आण्णासो वलशेट्टी, अमोल नाईक, श्रेणिक भेंडवाडे, सचिन बेडकीहाळे, उत्तम तळपदे, सागर चौगुले, शीतल तेरदाळे, कृष्णा लष्करे, महावीर वलशेट्टी, संजय सूर्यवंशी, मिलिंद कुलकर्णी, दगडू माळी, उत्तम हंडे, विलास जिरगे, सुशांत पुजारी, विजय मधाळे, मारुती शेवाळे, प्रकाश स्वामी, पिंटू करवते, मल्लया स्वामी, अनिल म्हाकाळे, कसनाळहुन निवृत्ती नाईक, पिंटू कांबळे, सचिन जाधव, ममदापूरहून निरंजन पाटील (सरकार ),गजानन कावडकर, कुर्लीहुन अरुण नीकाडे, श्रीनिवास पाटील, अजय पाटील व इतर मान्यवर उत्तम आण्णा युवा शक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य, पी के पी एस संचालक मंडळ सदस्य, सर्व युवक मंडळ सदस्य,महिला स्व सहाय्य संघ सदस्य, अरिहंत बँक संचालक व इतर मान्यवर व उत्तम आण्णा प्रेमी उपस्तिथ होते
कार्यकमाचे प्रास्ताविक संदीप बन्ने यांनी केले तर सुत्रसंचलन त्रिशला भागाजे यांनी केले तर आभार किरण नाईक कसनाळकर यांनी मानले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा