महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत श्रावणी शेळकेला रौप्यपदक
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सांगली जिल्हा तालीम संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत हेरवाडची कन्या श्रावणी ज्ञानेश्वर शेळके हिने 68 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून यश संंपादन केले आहे.
सांगली जिल्हा तालीम संघ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली येथे राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागातून खेळाडून सहभागी झाले होते, श्रावणी ही कुस्ती क्षेत्रातील नामवंत खेळाडून असून तिने विविध ठिकाणी झालेल्या स्पर्धेत यश संपादन केले आहे. सांगली येथील महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून यश संंपादन केले आहे.
श्रावणीला वडिल ज्ञानेश्वर शेळके, दादा लवटे, संदिप पाटील, रमेश कुंभार, ओम शेळके, अंकुश घुले रावसाहेब इंगवले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा