राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेला सलग सातव्यांदा बँको पुरस्कार

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

   येथील राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेला सलग सातव्यांदा बॅको पुरस्कार मिळाला. 75 ते 100 कोटी ठेवी असणार्‍या पतसंस्थेच्या कॅटॅगरीमध्ये शाहू पतसंस्थेचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात ठाणे जिल्हा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते पतसंस्थेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष दादासो पाटील व स़ंस्थेचे अध्यक्ष किरण आलासे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

   रिझर्व्ह बॅंक व सहकारातील नियमांचे काटेकोर पालन करुन पारदर्शक कारभार करणाऱ्या राज्यातील पतसंस्थांचा सर्वे करून अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सि इनमा पुणे यांच्या वतीने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जातो.

   राजर्षी शाहू पतसंस्थेने 81 कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून 52 कोटी कर्ज, 99 टक्के कर्जाची वसुली, एनपीए सतत 0 टक्के, सभासदांना लाभांश, शेअर भांडवल व संस्थेचे फंडस मिळून दहा कोटीचा टप्पा पार, संस्थेच्या सहाही शाखा स्वमालकीच्या असून सर्वच शाखा स़गणकीकृत अशा आर्थिक घडीबरोबरच सामाजिक कार्यात संस्था नेहमी अग्रस्थानी असते. या सर्वच कारभाराचा लेखाजोखा करून संस्थेला सहकारातील मानाचा समजला जाणारा बॅको पुरस्कार मिळाला आहे.

     पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक जिनगोंडा पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब उगारे, धनपाल कोथळी, महावीर पोमाजे, दौलत कांबळे, मिरअहमद बागवान, बंडू उमडाळे, विजय जोंग, अभिजित पाटील, सतिश उपाध्ये आदी संचालकासह संस्थेचे व्यवस्थापक संजय गजन्नावर आदी उपस्थित होते.

 अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सि इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली नऊ वर्षे सहकारात चांगले काम करणार्या पतसंस्थांना बॅको पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. राजर्षी शाहू पतसंस्थेने या स्पर्धेत भाग घेवून सतत सात वर्षे पुरस्कार मिळविण्यात यशस्वी ठरले आहे. पतसंस्थेला यापूर्वी आदर्श संस्था, आदर्श सचिव आणि आदर्श चेअरमन अशा सहकारातील विविध पुरस्कार मिळाले असून सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.


   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष